मुंबई – सलमान खान चुलबुल पांडे’च्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या बहुचर्चित ‘दबंग ३’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. ‘. या चित्रपटाचे आत्तापर्यंत बरेचसे अपडेट्स सलमानने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्याने संपूर्ण टीमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
#Dabangg3 pic.twitter.com/VZecKOtaYD
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) October 6, 2019
विशेष म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांच्या बर्थ अनिव्हर्सरीच्या दिवशीच शूटिंग पूर्ण झाल्याने सलमानने या व्हिडिओतून त्यांना आदरांजली वाहिली आहे. विनोद खन्ना आणि सलमान खान यांनी ‘दबंग’, ‘दबंग २’ आणि वॉन्टेड यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘दबंग’ चित्रपटात विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. आता ‘दबंग ३’ चित्रपटात विनोद यांचे भाऊ प्रमोद खन्ना हे त्यांच्या जागेवर दिसणार आहेत.
‘दबंग ३’चे दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केले आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर, अरबाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.