मुंबई – ‘दगडी चाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. आता दगडी चाळचा दुसरा भाग येत्या ऑगस्ट महिन्यात रिलीज होतोय. अभिनेता मकरंद देशपांडेचा ‘डॅडी’ लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. चित्रपटाचा टीजर रिलीज झाल्यानंतर सगळ्यांनाच याची उत्सुकता होती कि या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी दिसणार कि नाही ? मात्र हा सस्पेन्स आता संपला आहे कारण या चित्रपटातील अंकुशच्या लूक सध्या रिव्हील झाला आहे.
मुंबईतील गॅंगवॉरवर आधारित असलेला हा सिनेमा आणि त्यात मकरंद देशपांडे यांनी साकारलेली ‘डॅडी’ची व्यक्तिरेखा आजही सर्वांना हुबेहूब अरुण गवळीची आठवण करून देते. त्यामुळे चित्रपटाच्या दुसऱ्या टीजरला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. आता यातील सूर्या म्हणजेच अंकुश चौधरीचा लूक समोर आला आहे. आय हेट यु डॅडी असं लिहिलेलं पोस्टर सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
जे घडून गेलं ते पुसता नाही येणार…पण आता जे घडणार आहे ते कोणालाही थांबवता नाही येणार…नजरेत धार, अंगात रग आणि हृदयात आग…तो येतोय पुन्हा…असे कॅप्शन असलेले पोस्टर सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडतंय.