पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा क्रीडा विभाग आणि अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हा आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण सोमनाथ फलके याने पुणे जिल्हा श्री २०२४ हा मानाचा किताब पटकावला.
या विजयामुळे भूषण फलके याची पुढील पुणे विद्यापीठ आंतरविभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड झाली. या गौरवप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. रणजीत पाटील, उपप्राचार्य जयवंत बाबर, उपप्राचार्य डॉ. किशोर निकम, शारीरिक शिक्षण संचालक लेफ्टनंट डॉ. ज्ञानेश्वर माने, समाधान इंगवले, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भूषण फलके याचे अभिनंदन केले. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या.