नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर सध्या डी कंपनी असल्याचे दिसत आहे. कारण एनआयएकडून मुंबईत 20 ठिकाणी छापेमारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. दाऊदशी संबंधित अनेक जणांवर एनआयएचे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकल्याचे सांगण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांच्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ठिकाणांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा हात आहे. याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. अदरम्यान, असेही म्हटले जात आहे कि, मुंबईत एनआयएची कारवाई सुरु आहे. मुंबईच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारात छापेमारी सुरु झाली आहे. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग स्मगलर आणि असे अनेक लोक आहेत.