प्रजासत्ताकदिनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा प्रमुख अतिथी

नवी दिल्ली -प्रजासत्ताक दिवस हा 26 जानेवारी रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाची तयारी जय्यत सुरू असून या वर्षी 90 मिनिटांचे पथसंचलन होणार आहे. विविध राज्यांचे आणि केंद्र सरकारच्या 22 विभागाचे पथसंचलन होणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम जोरात चालू आहे. प्रजासत्ताक दिनी प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा उपस्थित राहणार आहे.

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे पुष्पचक्र चढवून प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विविध राज्यांच्या प्रमाणे केंद्र सरकारच्या विभाग देखील पथसंचलनात सहभागी होणार आहे. सांस्कृतिक विषयावर आधारित काही पथसंचलनात नृत्यदेखील होणार आहे व त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 26 मुलांचा खुल्या जीपमधून सहभाग असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकरा वर्षानंतर प्रथमच महात्मा गांधी यांच्या समाधीचे संरक्षण करणाऱ्य़ा सीआईएसएफची तुकडी देखील पथसंचलनात सहभागी हेणार असल्याचे समजते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरीज रामफोसा मुख्य अतिथी, विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार रामफोसासमवेत त्यांच्या पत्नी डॉ. शेपो मोपोसे, नऊ मंत्री, त्यांच्यासमवेत प्रतिनिधी मंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि 50 सदस्यांचे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)