विश्रांतवाडी, दि. 19 (प्रतिनिधी) -अजिंक्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. या रॅलीला विद्यार्थी, प्राध्यापक व परिसरातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिल्यामुळे या सायक्लोथॉनला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.
अजिंक्य डी.वाय. टेक्निकल कॅम्पस व प्राइड वर्ल्ड सिटी यांच्या विद्यमाने सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसह युवा पिढीत सायकलचा वापर वाढावा तसेच आरोग्य सुधारून सदृढ युवा पिढी निर्माण व्हावी, त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण व्हावे, हा मुख्य उद्देश असल्याचे कॅम्पसच्या डायरेक्टर डॉ. कमलजीत कौर यांनी सांगितले. उपक्रमाबाबत प्राचार्य डॉ. फारुख सय्यद यांनी माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.इ.बी. खेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.