पिंपरी, दि. 17 (प्रतिनिधी) -मागील काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सायकलविरोधी निर्णय घेतला. त्यांचा विरोधात शनिवारी (दि. 17) इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या सदस्यांनी विद्यापीठाच्या आवारामध्ये आंदोलन केले. यावेळी विद्यापीठ आवारात सायकल प्रवेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
गेल्य काही दिवसांपासून सायकल स्वरांना विद्यापीठात येण्यास बंदी घालण्यात आली होती. यासंदर्भात अनेकांनी संस्थेकडे तक्रार केली होती. विद्यापीठ आवारातील दाट झाडीमुळे अनेक नागरिक सायकलवर येथे सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात.अशा वातावरणामध्ये त्याचप्रमाणे दिवसभर देखील विद्यापीठांमध्ये इतर वाहनांची वर्दळ असते. परंतु, सायकलवर येण्याला येथे बंदी घालण्यात आली, असे संस्थेचे सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.
विद्यापीठाने लवकर हा निर्णय मागे घ्यावा आणि सायकलस्वारांना घातलेली बंदी उठवावी, या मागणीचे निवेदन इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील यांनी केले. तर आंदोलनामध्ये गिरीश परदेशी, सुनील चाको, रमेश माने, बाळासाहेब कांबळे, अजित गोरे, संदीप परदेशी, अमीर शेख, अमीन शेख, उमा डोंगरे, सुरेश माने, सुहास पवार युवराज पाटील आदींनी सहभाग घेतला.