पाषाण ते विद्यापीठ रस्त्यावर सायकल ट्रॅक

1 कोटी 4 लाख 96 हजार 938 रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी

पुणे – पाषाण रस्त्यावर विद्यापीठ चौक ते एनसीएल गेट या दरम्यान महापालिकेच्या वतीने सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी 1 कोटी 4 लाख 96 हजार 938 रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी ही माहिती दिली.

पुण्याला पुन्हा “सायकलींचे शहर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी आणि शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी महापालिकेने सार्वजनिक सायकल धोरण मंजूर केले आहे. या धोरणांतर्गत शहरातील विविध रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार करण्यात येत आहेत. यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली आहे.

या योजनेंतर्गत पाषाण रस्त्यावर विद्यापीठ चौक ते एनसीएल गेट यादरम्यान सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये दोन्ही ठेकेदार पात्र ठरले.

त्यातील मे. राधालक्ष्मी कन्स्ट्रक्‍शन यांची निविदा कमी दराने आल्याने त्यांच्याकडून 1 कोटी 4 लाख 96 हजार 938 रुपये खर्च करून ट्रॅकचे काम करून घेण्याला आणि त्याच्याशी करार करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. तो मंजूर करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.