पुण्यात सोने व्यापारी दुकानावर सायबर हल्ला; ३ कोटी लंपास

पुणे: पुण्यातील सुप्रसिद्ध सोने व्यापारी यांच्या 12 बँक खात्यातील 2 कोटी 98 लाख 400 रुपयांवर सायबर चोरट्याने डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. महासिक्युअर अ‍ॅपमध्ये सायबर चोरट्याने लॉगइन करुन पासवर्ड बदलून हा गुन्हा करण्यात आला आहे. ही घटना ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सायबर चोरट्यांनी सोने व्यापारी यांच्या बँक खात्यातून ही रक्कम २० बँक खात्यात ट्रान्सफर केली आहे. या कंपनीचे महासिक्युअर अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व बँक व्यवहार केले जातात. याच अ‍ॅपमध्ये चोरटयांनी शिरकाव करत डल्ला मारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.