बर्मिंगहॅम – भारतीय महिलांनी लॉन बॉल्स स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुरुष संघाच्या अंतिम लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमारसिंग व दिनेश कुमार या भारतीय संघासमोर सुवर्णपदकासाठी नॉर्दन आयर्लंडचे आव्हान होते.
चौथ्या फेरीपर्यंत भारतीय संघ 0-7 असा पिछाडीवर होता. परंतु पुढील दोन फेरींत दोन गुण घेत त्यांनी पिछाडी 2-7 अशी कमी केली. सातव्या फेरीत आयर्लंडने 3 गुण घेताना आघाडी 10-2 अशी भक्कम केली.
यानंतरही भारतीय खेळाडूंनी अखेरपर्यंत प्रयत्न करत 5-18 अशा पराभवामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, भारतीय संघाने उपांत्य फेरीत यजमान इंग्लंडचा 13-12 अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.