दुबई : सौरभ नेत्रवालकर, इयान हाॅलैंड आणि कैमरन स्टीवेंसन यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ‘यू.एस.ए’ ने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ मधील एकदिवसीय सामन्यात संयुक्त अरब अमीरात (यू.ए.ई) चा ९८ धावांनी पराभव करत विजय साकारला आहे. यू.एस.ए चा सौरभ नेत्रवालकर हा सामनावीर ठरला, त्याने गोलंदाजीत ९ षटकात ११ धावा देत ३ गडी करत संघाच्या विजया़त मेलाचा वाटा उचलला.
An outstanding performance from USA sees them beat UAE by 98 runs in their ICC Cricket World Cup League 2 fixture.#RoadToCWC23 https://t.co/xzest7BLUm
— ICC (@ICC) December 12, 2019
संयुक्त अरब अमीरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यू.एस.ए ने ४९.५ षटकात सर्वबाद २१३ धावा केल्या. यू.एस.ए कडून फलंदाजीत आरोन जोन्सने ४६, अक्षय होमराजने ३४ आणि निसारग पटेलने ४० धावा केल्या गोलंदाजीत यू.ए.ई कडून जुनैद सिद्दीकी, जहूर खान, डेरियस डी सिल्वाने प्रत्येकी २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरात विजयासाठी २१४ धावांचा पाठलाग करताना संयुक्त अरब अमीरात (यू.ए.ई) चा संघ ३३ षटकात सर्वबाद ११५ धावापर्यतच मजल मारू शकला आणि यू.एस.ए ने हा सामना ९८ धावांनी जिंकला. यू.ए.ई कडून फलंदाजीत बासील हमीदने सर्वाधिक ३८ आणि वृत्ति अरविंदने २३ धावा केल्या तर यू.एस.ए कडून गोलंदाजीत सौरभ नेत्रवालकर, कैमरन स्टीवेसन आणि इयान हाॅलैंडने प्रत्येकी ३ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
लीग मधील यू.एस.ए चा पुढचा सामना स्काॅटलंड संघाशी शुक्रवारी (१३ डिसेंबर) तर यू.ए.ई चा पुढील सामना स्काॅटलंड संघाशी रविवारी (१५ डिसेंबर) होणार आहे.