#CWCLeague2 : स्काॅटलंडचा यू.एस.ए वर विजय

दुबई : कैलम मैकलाॅडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्काॅटलंड ने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ मधील पाचव्या एकदिवसीय सामन्यात यू.एस.ए चा ४ गडी राखून पराभव करत विजय संपादित केला आहे. गोलंदाजीत १० षटकात ४६ धावा देत २ बळी घेणारा आणि फलंदाजीत २५ चेंडूत नाबाद २६ धावा करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारा स्काॅटलंडचा जोश डेवी सामन्याचा मानकरी ठरला.

स्काॅटलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत यू.एस.ए ला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. त्यानंतर फलंदाजी करताना यू.एस.ए ने स्टीवन टेलरच्या ५६, जेवियर मार्शलच्या ५०, निसारग पटेलच्या ३८ आणि कैमरन स्टीवंसेनच्या नाबाद ३४ धावांच्या खेळीवर ५० षटकांत ९ बाद २४५ अशा धावा केल्या होत्या. स्काॅटलंडकडून गोलंदाजीत मार्क वाटने ३ तर हमजा ताहिर, अलसादेयर इवांस आणि जोश डेवीने प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात विजयासाठीचे २४६ धावांचे आव्हान स्काॅटलंडने ४८.५ षटकात ६ बाद २४६ धावा काढत पूर्ण केले. स्काॅटलंडकडून कैलम मैकलाॅडने ६२ आणि रिची बेरिंगटनने ३६ धावांची खेळी केली. तर साफयान शरीफने नाबाद २६ आणि जोश डेवीने नाबाद २६ धावा करत संघास विजय मिळवून दिला. यू.एस.ए कडून स्टीवसेनने ३ तर सौरभ नेत्रवालकर आणि नौस्टुश केन्जीगेने १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.