कीर्तिपूर : आकिब इलयासच्या नाबाद शतकी आणि जीशान मकसूदच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर ओमानने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ मधील चौथ्या सामन्यात नेपाळचा ८ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. आकिब इलयास सामन्याचा मानकरी ठरला.
💯
An unbeaten maiden ODI century for Aqib Ilyas saw Oman take a comfortable victory over hosts Nepal 🎉 #CWCL2 | #RoadToCWC23 pic.twitter.com/zKWDg1SAWX
— ICC (@ICC) February 9, 2020
नेपाळने विजयासाठी दिलेले २५० धावांचे आव्हान ओमानने ४७.२ षटकात २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. ओमानकडून जतिदर सिंहने २३(४१), खावर अलीने ४१(५६), जीशान मकसूदने नाबाद ६८(७९) आणि आकिंब इलयासने नाबाद १०९(१०८) धावांची खेळी केली. नेपाळकडून सुशान भरि आणि कुशाल मल्ला यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
Nepal post 249/8 against Oman in #CWCL2
They defended 190 yesterday against USA. Can they get a second consecutive win today?
📺 Catch live action here: https://t.co/dhtlODebff pic.twitter.com/TjzkYDVn56
— ICC (@ICC) February 9, 2020
तत्पूर्वी, ओमानने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ज्ञानेंद्र मल्लाच्या ५६(७६), पारस खडकाच्या ३८(३४) आणि विनोद भन्डारीच्या ३५(४७) धावांच्या जोरावर ५० षटकात ८ बाद २४९ अशी मजल मारली होती. ओमानकडून गोलंदाजीत आकिब इलयासने १० षटकात ३६ धावा देत सर्वाधिक ४ तर मोहम्मद नदीमने ८ षटकात ४४ धावा देत ३ गडी बाद केले.