कार्तिपुर : संदीप लामिछाने आणि सुशान भरिच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर नेपाळने आयसीसी सीडब्ल्यूसी लीग-२ स्पर्धेतील सहाव्या सामन्यात यू.एस.ए संघाचा ८ विकेटनी पराभव करत विजय नोंदविला. संदीप लामिछाने सामन्याचा मानकरी ठरला.
A real disaster of a day in the final match of the series as #TeamUSA🇺🇲 are beaten out of sight by Nepal to leave us winless from our 4 ODI's here in Kathmandu
FULL SCORECARD ➡️: https://t.co/PMQm0FCKa1#CWCLeague2 #NEPvUSA🇳🇵🇺🇲 pic.twitter.com/UYgn1coPaB
— USA Cricket (@usacricket) February 12, 2020
नेपाळने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना यू.एस.ए संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर नेपाळच्या गोलंदाजीसमोर यू.एस.ए संघाचा डाव १२ षटकात अवघ्या ३५ धावसंख्येवरच संपुष्टात आला. यू.एस.ए च्या जेवियर मार्शलने सर्वाधिक १६(२२) धावांची खेळी केली, त्याच्याशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
USA ARE ALL OUT FOR 35 🤯
Sandeep Lamichhane picks up six wickets while Sushan Bhari chips in with four as Nepal dismiss the visitors for the joint-lowest ODI score.
What a show from the hosts!#CWCL2 | #RoadToCWC23 pic.twitter.com/CCu1OFySsm
— ICC (@ICC) February 12, 2020
नेपाळच्या संदीप लामिछाने याने ६ षटकात १६ धावा देत ६ तर सुशान भरिने ३ षटकात ५ धावा देत ४ गडी बाद केले.
6⃣-1⃣-1⃣6⃣-6⃣
Best figures by a Nepal bowler in an ODI!
Sandeep Lamichhane, you beauty! 🤩#CWCL2 | #RoadToCWC23 pic.twitter.com/lfcQUdMOMO
— ICC (@ICC) February 12, 2020
विजयासाठीचे ३६ धावांचे आव्हान नेपाळने ५.२ षटकात २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. नेपाळकडून फलंदाजीत पारस खडकाने नाबाद २०(१२) तर दीपेंद्र सिंह ऐरीने नाबाद १५(११) धावांची खेळी केली. यू.एस.ए कडून नौस्टुश केन्जी़गेने २.२ षटकात १५ धावा देताना २ गडी बाद केले.