World Cup 2023 #INDvPAK Match Playing 11 : विश्वचषक 2023 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ आज (शनिवार,14 ऑक्टोबर) पहिल्यांदा आमनेसामने येत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावरील स्पर्धेतील हा दुसरा सामना असेल. याआधी सलामीच्या लढतीत गतविजेत्या इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता भारत आणि पाकिस्तानचे संघ एक लाखाहून अधिक प्रेक्षकांसमोर एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाचवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आपले इरादे स्पष्ट केले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला. रोहित शर्माच्या शानदार शतकामुळे संघाला मोठा विजय मिळाला. आता भारतीय संघाची नजर विजयाची हॅट्ट्रिक करण्याकडे आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(Toss) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. (India won the toss and elected to field) कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केलं आहे.
रोहित शर्माने सांगितले की,या सामन्यात शुभमन गिलचे पुनरागमन झालेे असून इशान किशनला संघातून वगळले आहे. बाबर म्हणाला की,आम्ही Toss जिंकला असता तर आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला असता.आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.
दोन्ही संघाचे Playing 11 खालीलप्रमाणे :-
भारत : शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने 1992, 1996, 1999, 2003, 2011, 2015 आणि 2019 मध्ये पाकिस्तानचा पराभव केला आहे. भारतीय संघाला ही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे. टीम इंडिया तिसर्यांदा विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. भारताने 1996 (बंगलोर) आणि 2011 (मोहाली) मध्ये विजय मिळवला होता.