World Cup 2023 India vs Afghanistan Match : टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सामना अफगाणिस्तानशी होता. भारताने हा सामना आठ गडी राखून सहज जिंकला. या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी केली आणि 90 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला, मात्र स्टेडियममध्ये उपस्थित दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना भिडले.
भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये सामना सुरू असताना जोरदार बाचाबाची झाली. मात्र, स्टेडियममध्ये उपस्थित अन्य प्रेक्षकांनी दोन्ही देशांच्या चाहत्यांना शांत केले आणि प्रकरण फारसे बिघडले नाही. या हाणामारीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
Fans getting authentic Delhi experience. pic.twitter.com/VIe09AGbHq
— Trendulkar (@Trendulkar) October 11, 2023
या संदर्भात बीसीसीआय, आयसीसी किंवा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 11 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चाहत्यांच्या जर्सी पाहता हा व्हिडिओ जुना नाही असे म्हणता येईल. मारामारीचे कारण काय आणि हाणामारीत कोण कोण होते. याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
Big fight at Delhi Ground and Haters says there isn’t any crowd. Seems like #IndiaVsPakistan is around the corner.pic.twitter.com/NA4aPDg62x#INDvsAFG #NaveenUlHaq #Naveen #Kohli #rohit #INDvsPAK #RohitSharma #Hitman
— ICT Fan (@Delphy06) October 11, 2023
भारताने हा सामना आठ गडी राखून जिंकला
या सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तानचा आठ गडी राखून पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमावून 272 धावा केल्या. कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 80 धावांची तर अजमतुल्ला उमरझाईने 62 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात भारताने 35 षटकांत दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.
कर्णधार रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 131 धावांची खेळी केली. या खेळीसाठी रोहितला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. तर विराट कोहली 56 चेंडूत 55 धावा करून नाबाद राहिला. त्याने 35व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. भारताचा पुढचा सामना आता 14 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये पाकिस्तानशी होणार आहे.