#CWC19 : नाणेफेक जिंकत भारताची प्रथम फलंदाजी

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. पाच सामन्यांत चार विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच केली आहे. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डवर होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ भारताचा विजयरथ रोखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, फॅबिअन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, शिमोरन हेटमेयर, शाय होप, एल्विन लुईस, अशले नर्स, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), केमार रोच, सुनील ऍम्ब्रिस, ओशाने थॉमस.

Leave A Reply

Your email address will not be published.