लंडन – क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर आज विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान सामना रंगला होता. न्यूझीलंडने उपांत्यफेरीत भारताचा तर इंग्लडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना टाय झाला असून थोड्याच वेळात सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंड संघाला वोक्स आणि लियाम प्लंकेट यांच्या धमाकेदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 241 धावांवर रोखले होते. २४१ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात देखील खराबच झाली होती.