कोलकाता: इंडियन प्रीमिअर लीगचा 2020 मोसमासाठीचा लिलाव 19 तारखेला होणार आहे. लिलावासाठी एकूण 971 खेळाडू यादीत होते. मात्र, त्यातून 639 खेळाडूंचा पत्ता कट करण्यात आला आहे, त्यामुळे 332 खेळाडूंसाठी हा लिलाव होणार आहे.
332 खेळाडूंची नावे आठही संघांना पाठवण्यात आली आहेत. त्यात सर्वात महागडा भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पा आहे. उथप्पाची बेस प्राईज दीड कोटी आहे.
केसरीक विल्यम्स लक्षवेधी भारताचा कर्णधार विराट कोहलीशी वारंवार पंगा घेणारा वेस्ट इंडिजचा केसरीक विल्यम्स या लिलावात उभा आहे. भारत आणि वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान केसरिक विल्यम्स बराच चर्चेत आला. त्याचा आणि कोहलीचा अनेकदा संघर्ष झाला आहे.