धनकवडी – बालाजीनगर, धनकवडी परिसरात दोन महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू असताना विजेचे बिल मात्र तिप्पट आकारून महावितरणकडून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करावा, बिलांत दुरुस्ती करावी, याबाबतचे निवेदन भाजपाच्या वतीने पद्मावती येथील महावितरण कार्यालयात देण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळातील मीटर रीडिंग न घेता सरासरी बिल पाठविण्यात आले असले तरी ते तिप्पट, चौपट पाठविण्यात आले आहे, अशी स्थिती असताना महावितरणकडून येथील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक तसेच व्यावसायिक हैराण झाले आहे. वीज खंडित होण्याचा प्रकार थांबला नाही तर भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे नेते दिगंबर डवरी यांनी दिला आहे.
पद्मावती येथील महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता जे. के. कस्पटे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जितेंद्र कोंढरे, राजेंद्र धुमाळ, अशोक कोंडे, योगेश वावळ, पद्माकर नस्ते, स्वप्निल पवार उपस्थित होते.