मुंबई – पोलिसांनी बांद्रा उपनगर आणि नवी मुंबई येथे छापे टाकून तीन नायजेरियन नागरीकांना अटक केली असून त्यांच्याकडून 3 कोटी 18 लाख रूपयांचे मादक द्रव्य जप्त करण्यात आले आहे. पकडण्यात आलेले तीन नायजेरियन नागरीक हे मादक द्रव्यांच्या आंतरराष्ट्रीय टोळीतील सदस्य असावेत असा कयास आहे.
या नागरीकांनी नव वर्ष स्वागतासाठी विक्रीसाठी ही मादक द्रव्ये आणली होती. ही कारवाई मुंबई पोलिसांच्या मादक द्रव्य विरोधी पथकाने केली आहे. ही मादक द्रव्ये मानखुर्दच्या रेल्वे ट्रॅकवर नेऊन विकली जात होती. ते त्यांच्या नियमीत विक्रीचे ठिकाण असल्याचेही या कारवाईत उघड झाले आहे. हे, तिन्ही आरोपी वाशीत राहात होते. कापडाच्या व्यापारासाठी आपण मुंबईत आलो आहोत असे भासवून ते मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार करीत असत.