पुणे – दारुच्या नशेत बेदरकारपणे एसटी बस घेऊन निघालेल्या बसचालकास प्रवाशांनी अडवले. कंधार-आळंदी बसमधील हा प्रकार आहे. सध्या ही गाडी शिरूरच्या अलीकडे असून पोलिसांना बोलावण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सावधगिरीमुळे मोठा अपघात टळला.
कंधार ते आळंदी एसटी बस 2 ड्रायव्हर आणि 1 कंडक्टरसह सकाळी 10 वाजता निघाली कंधारवरून निघाली. यावेळी रस्त्यात पाटोदा आणि जामखेड अशा दोन ठिकाणी गाडी पंक्चर झाली. त्यानंतर बस शिरूर जिल्ह्याजवळ असताना गाडी वेडीवाकडी चालत असल्याने प्रवाशांनी आवाज केला. त्यावेळी दोन्ही चालक मद्यधुंद असल्याचं लक्षात आले. व मद्यधुंद एसटी बस चालकांना प्रवाशांनी थांबवले. सध्या ही गाडी शिरूरच्या अलीकडे असून पोलिसांना बोलावण्यात आलं आहे.