पुणे – शहरात संचारबंदीचे निर्बंध कायम राहतील असेच एका आदेशातून पोलिसांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले आहेत. तसेच हे निर्बंध आणि संचारबंदी 17 मेपर्यंत कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी या संदर्भात आदेश जारी केले आहेत.
दुकाने उघडणार असले तरी ते गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ते सुरू ठेवायचे की नाही, या बाबतचे निर्णय पूर्णपणे पोलीस घेणार आहेत. याशिवाय नागरिकांना बाहेर पडताना मास्क, हॅण्डग्लोव्हज आणि अन्य सुरक्षेच्या साधनांचा वापर करावाच लागणार आहे. शहरातील मंदिरे, प्रार्थनास्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.