नवी दिल्ली – योगगुरू बाबा रामदेव यांनी करोनावर पहिले औषध शोधल्याचा दावा केला आहे. ‘कोरोनिल’ असे या करोना व्हायरसवर उपचार करण्याऱ्या औषधाचे नाव असून आज बाबा रामदेव यांनी ते लॉन्च केले आहे. या विषाणूला हरवण्यासाठी हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे.
We’ve prepared the first Ayurvedic-clinically controlled, research, evidence & trial based medicine for COVID19. We conducted a clinical case study&clinical controlled trial, and found 69% patients recovered in 3 days & 100% patients recovered in 7 days: Yog Guru Ramdev, Haridwar pic.twitter.com/QFQSVF0JIh
— ANI (@ANI) June 23, 2020
पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूर यांनी संयुक्तपणे कोरोनिल औषध तयार केले आहे. यासंदर्भात आज हरिद्वारच्या पतंजली योगपीठात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांनी पतंजलीकडून ते औषध कशा प्रकारे काम करते याची माहिती दिली आहे. तसेच हे औषध कशा प्रकार तयार करण्यात आले याची माहितीही बाबा रामदेव यांनी दिली.
बाबा रामदेव म्हणाले कि, लोक या औषधावर प्रश्न विचारत असतील. तरीही आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. या औषधाच्या चाचणी रुग्णांवर घेण्यात आल्या असून यातील ६९ टक्के रुग्णांचे अहवाल केवळ तीन दिवसात निगेटिव्ह आले आहे. तर पुढच्या 7 दिवसांत करोना रुग्ण पूर्ण बरा होऊन घरी जाईल, असा दावाही केला आहे. तसेच यात कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. या औषधाचा प्रयोग आतापर्यंत २८० लोकांवर करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तर आचार्य बालकृष्ण म्हणाले, पतंजली रिसर्च इस्न्टिट्यूटमध्ये यावर पाच महिने संशोधन करण्यात आले असून उंदरांवर याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तर क्लिनिकल कंट्रोल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे.
#आयुर्वेदविजय_कोरोनिल_श्वासारि#कोरोना की एविडेंस बेस्ड प्रथम #आयुर्वेदिक औषधि, #श्वासारि_वटी ,#कोरोनिल का संपूर्ण साइंटिफिक डॉक्यूमेंट के साथ #पतंजलि योगपीठ हरिद्वार से लॉन्चिंग व लाइव प्रेस वार्ता-https://t.co/tpoLAOvaQs
— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) June 23, 2020