विभाग, जिल्हा स्तरावर विशेष अधिकारी तैनात
पुणे(प्रतिनिधी) – राज्यातील शाळा विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणी करत असून याला आळा घालण्यासाठी आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी विभाग, जिल्हा स्तरावर विशेष अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
करोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. त्यातच शाळांनी पालकांकडून मागील वर्षाची व नवीन शैक्षणिक वर्षाची शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला आहे. यंदा कोणतीही शुल्कवाढ करु नये, लॉकडाऊनमध्ये पालकांकडे शुल्क मागू नये याबाबतचे आदेश शासनाने शाळांना दिले आहेत. मात्र, शाळा यांचे पालन करत नाहीत हे उघड झाले आहे. पालकांनी थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडेच तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी विशेष यंत्रणा निर्माण करण्याचे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले होते.
विद्यार्थ्यांच्या फी बाबत पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभाग, जिल्हा स्तरावर व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याने या कामासाठी जबाबदार संनियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात व त्याची नावे व मोबाइल क्रमांक विद्यार्थी, पालक यांच्यासाठी उपलब्ध करुन द्यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण आयुक्तालय व संचालनालयास सादर करावा असे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन त्याबाबतची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. पालकांच्या शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास या अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवाव्या लागणार आहेत. काही शाळांनी शासनाचे आदेश येण्यापूर्वीच फी वाढीचा निर्णय घेतला आहे. याबाबत जास्त तक्रारी पालकांकडून येण्याची शक्यता अधिक आहे.
संनियंत्रण अधिकाऱ्यांची नावे व संपर्क नंबर …
पुणे विभाग – मीना शेंडकर-9890643222, धनाजी बुट्टे -9922458799.
पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा – ज्योती परीहार – 8888225364, माध्यमिक शाळा – सुधाकर पाखरे-9822510618.
पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा – धनंजय परदेशी- 9404609170.
पिंपरी-चिंचवड महापलिका क्षेत्रातील शाळा- विलास पाटील-8007804777.
अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा – विलास साठे-9561722005, माध्यमिक शाळा-आर.एच.हराळ -9822558123.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळा – विष्णू कांबळे – 9403948359/8208525799, माध्यमिक शाळा- सुलभा वढारे – 9822062101.