नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्का प्रकरणातील दोषी विनय शर्मा आणि मुकेश सिंग यांच्या क्युरेटिव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आहे. या आरोपीना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती एन.व्ही. रामना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत आरोपींची याचिका फेटाळली आहे.मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
न्यायमूर्ती एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आरएफ नरिमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: This is a big day for me. I had been struggling for the last 7 years. But the biggest day will be 22nd January when they (convicts) will be hanged. https://t.co/GBfPt9ezIb pic.twitter.com/uMPcVfP7Sf
— ANI (@ANI) January 14, 2020
निर्भया प्रकरणातील आरोपींनी सर्व अधिकार वापरले आहेत. आरोपी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करु शकतात. दरम्यान न्यायालयाने या चारही आरोपीना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता त्यांना तिहार तुरुंगातील बाराक क्रमांक तीन मध्ये फाशी देण्यात येणार आहे.