नवी दिल्ली – भारतातील करोना संकट दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडे जगभरातून मदतीचा हात पुढं कऱण्यात येत आहे. त्यातच आयपीएल खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने भारताला या संकट काळात ३७ लाखांची मदत केली आहे.
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असलेल्या पॅट कमिन्सने भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनची पूर्तता व्हावी यासाठी पीएमकेअर फंडात ५० हजार डॉलरची अर्थात भारतीय रुपयांमध्ये ३७ लाखांची मदत दिली आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
एकीकडे करोनाच्या भीतीने अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धा सोडून जात आहे. अशा काळात कमिन्सने ही भरीव मदत केली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.