सरपंच कला सांस्कृतिक महोत्सवास प्रारंभ
वाल्हे -वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने तीन दिवसीय सरपंच कला सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 23) झाले असून, जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी उपस्थित भारावले होते, शुक्रवारी (दि. 24) व शनिवारी (दि. 25) वाल्हेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार, उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, सचिन लंबाते, सुनील पवार, पोपट पवार, सतीश सूर्यवंशी, प्रतीक धुमाळ, रेखा जाधव, केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर, सविता बरकडे, उषा पवार, जयश्री चव्हाण, आडाची वाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, हनुमंत पवार, इकबाल आतार, कांतीलाल पवार, अंजली कुमठेकर, सुरेखा भुजबळ, दीपाली भोसले, सुनीता भुजबळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या महोत्सवाला आमदार संजय जगताप यांच्या पत्नी राजवर्धीनी जगताप, सुनीता कोलते, पिसुर्टीचे माजी सरपंच अशोक बरकडे वाल्हे परिसरामधील अनेक गावांचे आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमास हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.
गुरुवारी परिसरामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केल्याचे सरपंच अमोल खवले यांनी सांगितले. महोत्सवात “नवीन वाघर’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजेंद्र बरकडे यांसह कलाकार समीक्षा सोनवलकर, संजय जाधव, आकाश शिनगारे व नुकताच लिंगाणा किल्ला सर केलेली चिमुकली गीर्यारोहक सह्याद्री महेश भुजबळ हिचा प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्का दुर्गाडे यांनी केले, तर ग्रामविकास अधिकारी बबन चखाले यांनी आभार मानले.