आबूधाबी – दीपक हुड्डाच्या नाबाद व तडाखेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जविरूध्दच्या सामन्यात 20 षटकांत 6 गडी गमावून 153 धावा केल्या. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान मिळाले आहे. प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्यासाठी पंजाबला या सामन्यात विजय आवश्यक असल्याने हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे.
Down, but #DefinitelyNot out 🤞🏻
Let’s defend this 💪#SaddaPunjab #IPL2020 #KXIP #CSKvKXIP pic.twitter.com/x41ahTjoED
— Kings XI Punjab (@lionsdenkxip) November 1, 2020
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारत पंजाबला फलंदाजीस पाचारण केले. त्यानंतर पंजाबकडून सलामीवीर के एल राहुल आणि मंयक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकांत 48 धावा जोडल्या.
मयंक अग्रवालला लुंगी एनगिडीने 26(15) धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर संघाची धावसंख्या 62 असताना लुंगी एनगिडीने राहुलला 29(27) धावांवर त्रिफळाचित करत पंजाबला दुसरा धक्का दिला.
त्यानंतर ठराविक अंतरावर पंजाबच्या विकेट गेल्या. क्रिस गेल 12, निकोलस पूरन 2, मनदीप सिंग 14 आणि जेम्स नीशम 2 धावा काढून बाद झाला. पण त्यांनतर दीपक हुड्डाने सूत्रं हाती घेत 30 चेंडूत (3 चौकार व 4 षटकार) नाबाद 62 धावा करत संघाची धावसंख्या 20 षटकांत 6 बाद 153 पर्यंत नेली.
चेन्ऩईकडून लुंगी एनगिडीने 4 षटकांत 39 धावा देत सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.