मुंबई : आयपीएल IPL 2022 मध्ये आज 38 वा सामना खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने पंजाबविरुद्ध टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईच्या संघाने या सामन्यात संघात कोणताही बदल केलेला नाही. आजच्या सामन्यासाठी पंजाब किंग्जने तीन मोठे बदल केले आहेत. वैभव अरोरा, शाहरुख खान आणि नॅथन एलिस यांच्या जागी संदीप शर्मा, ऋषी धवन आणि भानुका राजपक्षे यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
#CSK have won the toss and they will bowl first against #PBKS.
Live – https://t.co/V5jQHQZNn0 #PBKSvCSK #TATAIPL pic.twitter.com/QHkRVPVYkv
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पंजाब प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल, शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, भानुका राजपक्षे, ऋषी धवन, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, संदीप शर्मा, राहुल चह
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : राॅबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड़, अंबाती रायुडू, मिचेल सैंटनर, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रेटोरियस, मुकेश चौधरी, महीश थीक्षना
दरम्यान, पंजाब संघाने सातपैकी फक्त तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर आहे. तर चेन्नईचा संघ सात सामन्यांत पाच पराभवांसह नवव्या क्रमांकावर आहे.