क्रूड तेलाच्या किमती वाढण्याची शक्‍यता

इंधनदरवाढीवर होणार परिणाम

मुंबई – ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय तेलाच्या किंमतीनी 8 फेब्रुवारी ते 5 मे 2021 या कालावधीत 10 डॉलरर्यंत वाढल्या. एमसीएक्‍स फ्युचर्समध्ये याच कालावधीत तेलाचे दर 4200-5000 रुपये प्रती पिंप या श्रेणीत व्यापार करत होते.

डॉलर कमकुवत झाल्याने अमेरिका, चीन आणि युरोपमध्ये मागणी वाढण्याची शक्‍यता तसेच अमेरिकेतील तेलसाठ्यात घट, अमेरिकेतील रिफायनरी उपयोग दरात वाढ, चीनच्या तेल आयातीत वाढ, अमेरिका आणि चीनमधील लसीकरण हे सध्या क्रडसाठी प्रोत्साहनपर घटक ठरत आहे.

तसेच भारत, ब्राझील आणि जपानमध्ये कोरोना विषाणूच्या केसेस वाढत असतानाही तेलाच्या जागतिक मागणीत वाढीचे संकेत असल्यामुळे मे ते जुलैदरम्यान, ओपेक, रशिया आणि सदस्य राष्ट्रे तेल उत्पादनावरील निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथील करतील असे मत एंजल ब्रोकिंगचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले.

जागतिक हेज फंड मॅनेजर्समधील आशावाद तेलाच्या किंमती वाढण्यासही प्रोत्साहन देतात. इराण आणि ओपेक देशांकडून वाढता तेलपुरवठा हा तेलाच्या किंमतीतील संभाव्या वाढीसाठी अडथळा ठरू शकतो. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआय तेलाचे दर एका महिन्यात 70 डॉलरच्या पुढे कायम राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे इंधनदरवाढीवर परिणाम होऊ शकतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.