शामली – केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह झाडाल्या लटकलेल्या अवस्थेत उत्तर प्रदेशातील शामली येथे मिळाला. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
राजीव हा सुटीवर गावी आला होता. त्याने गावात झाडाला गळफास लावून घेतला. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे.