नवी दिल्ली: केंद्रीय राखीव पोलिस दलाने काश्मीरातील अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली असून त्यासाठीचे फोन क्रमांकही त्यांनी वाढवले आहेत. ही हेल्पलाईन मददगार नावाने अस्तित्वात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नागरीकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सीआरपीएफच्यावतीने करण्यात आले आहे. या हेल्पलाईनसाठी 14111 हा नंबर नागरीकांना देण्यात आला होता.
परंतु राज्यातील संपर्क साधनांवर निर्बंध आणण्यात आल्यानंतर या क्रमांकावर संपर्क करण्यात नागरीकांना अडचण येत होती. पण आता त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. या खेरीज श्रीनगरातील लोक सीआरपीएफच्या ट्विटरवरही संपर्क करू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती हाताळण्यासाठी सीआरपीएफच्या आणखी 120 कंपन्या तिकडे तैनात करण्यात आल्या आहेत.