तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी
हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर पंधरा नंबर येथील चढावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला.
अरविंद रामचंद्र देशपांडे (वय 53 रा.गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात दुपारी 2:45च्या सुमारास घडला. ट्रॅक चालकाला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
रामटेकडी औद्योगिक वसाहत येथील ईगल बर्गन या कंपनीत देशपांडे हे दुपारच्या पाळीला कामाला चालले होते. अपघातानंतर तासाभरानंतर वाहतूक पोलीस व हडपसर पोलीस घटनास्थळी आले. तोपर्यंत महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस आल्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.