अंगारकी संकष्टीनिमीत्त राज्यातील गणपती मंदीरांमध्ये भाविकांची गर्दी

मुंबई : अंगारकी संकष्टीनिमीत्त राज्यातील गणपती मंदीरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. संपुर्ण वर्षभरात एकच अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी मंदीरांमध्ये बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईचे आराध्य दैवत आणि लाखो भक्‍तांचे सिद्धीविनायक मंदीरात रात्रीपासूनच भाविकांनी बाप्पांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, मंदीरात आज दिवसभरात 10 ते 12 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज मंदीर प्रशासनाकडून व्यक्‍त करण्यात आला आहे.

आजच्या अंगारकी संकष्टीला अत्यंत महत्व आहे कारण यंदाच्या वर्षात ही एकच अंगारकी चतुर्थी आहे यानंतर मात्र भाविकांसाठी 2021 मध्ये अंगारकी संकष्टीचा योग असणार आहे. दरम्यान, या कारणांमुळे राज्यातील गणपती मंदीरांसह मुंबईतील सिद्धीविनायक मंदीरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच भाविकांची कसून चौकशी आणि तपासणी करण्यात येत असून मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईसह पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणेश मंदीर, गणपतीपुळेचे गणेश मंदीर याठिकाणीदेखील भाविकांनी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)