भोरमध्ये मतदान साहित्य घेण्यासाठी गर्दी

भोर- भोर विधानसभा मतदार संघातील 529 मतदान केंद्रावरील नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप करण्यात आले. मतदान साहित्य घेण्यासाठी भोरच्या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात एकच गर्दी झाली होती.

भोरमध्ये 239, मुळशी 195 व वेल्हे 95 तालुक्‍यात मतदान केंद्र असून, एकूण 3 लाख 60 हजार 254 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 लाख 90 हजार 401 पुरुष तर 1 लाख 59 हजार 850 महिला व तीन तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.