घाटांवर घरगुती गणपती विसर्जनासाठी गर्दी : निर्माल्य संकलनासाठी कर्मचारी उपस्थित

पुणे : शहरात मानाच्या पाचही गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली आहे. दरम्यान, मानाच्या गणपती पाठोपाठ आता घरगुती गणपतींचे विसर्जनही करण्यात येत आहे. विसर्जन घाटांवर घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.

घाटावर बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्‍तांची गर्दी होत आहे. तसेच घाटावर गणपतींच्या विसर्जनानंतर होणाऱ्या निर्माल्य ाचा त्रास होवू नये यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीन घाटावर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. निर्माल्य संकलनासाठी प्रतिष्ठानाच्या वतीने कर्मचारी घाटावर उपस्थित आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)