कोल्हापूर: अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. हि सभा सुरु असताना प्रचंड गदारोळ झाला असल्याची माहिती समोरच्या आली आहे. या गदारोळामुळे सभेचे कामकाज अर्ध्यवरच गुंडाळावे लागले आहे. या सभेत कार्यवाहकीपदी असणाऱ्या अभिनेते सुशांत शेलार यांच्या अंगावर कागदपत्रे भिरकावत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडल्याची माहिती समोर अली आहे.
भाषण संपल्यानंतर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ब्रेक जाहीर करत ते तिथून बाहेरपडण्यासाठी निघाले. परंतु संतापलेल्या सभासदांनी त्यांना बाहेर जायला मज्जाव करत दारातच अडवले. आणि सभा सोडून जाऊ नका, अशी भूमिका घेत सभासदांनी संताप व्यक्त केला.
खोटा गुन्हा दाखल केलेल्या तीन सदस्यांचं सभासदत्व रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर व्यासपीठावरून खाली जाऊन संचालक मुद्दा मांडणार असतील तर त्यांनी महामंडळाचा राजीनामा द्यावा, असं मेघराज राजेभोसले यांनी रणजीत जाधव यांना सुनावलं. त्यातच भाषण संपवून मेघराज राजेभोसले तातडीने सभागृहाबाहेर पडू लागले त्यावर सभासदांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना दारात अडवत सभेत यायला भाग पाडलं.
दरम्यान सभेत झालेल्या गदारोळाबद्दल कार्यवाहक शेलार यांनी खेड व्यक्त केला असून, जो कागद भिरकावण्यात आला, तो न्यायालयाचा निकाल होता. त्याचा अवमान करण्यात आला आहे, अशा शब्दांत शेलार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या गदारोळानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनाही पाचारण करण्यात आले होते.