दिलासादायक ! करोनामुक्तांचा दोन कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली  – गेल्या 24 तासातील करोना मुक्तांची संख्या धरून भारताने करोना मुक्त झालेल्या संख्येने दोन कोटीचा टप्पा पार केला. त्यामुळे बरे झालेल्यांचे प्रमाण 83.50 टक्के झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

देशांत आजपर्यंत दोन कोटी 79 हजार 599 मृत्यू झाले आहेत. त्यात गेल्या 24 तासांत बरे झालेल्या तीन लाख 43 हजार 776 जणांचा समावेश होता. तर तीन लाख 43 हजार 144 नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे सक्रिय बाधितांची संख्या पाच हजार 632 ने कमी झाली.

बरे झालेल्यांमध्ये 10 राज्यांचा वाटा 71.16 टक्के आहे. त्यात महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, प. बंगाल, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि दिल्लीचा समावेश आहे.
भारतातील सक्रीय बाधितांचा संख्या घटून ती 37 लाख चार हजार 893 वर पोहोचली.

एकूण बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण 15.41 टक्के आहे. नऊ हजार 294 ऑक्‍सिजन कॉन्स्ट्रेटर्स, 11 हजार 835 ऑक्‍सिजन सिलिंडर, 19 ऑक्‍सिजन जनरेशन प्लांट, सहा हजार 439 व्हेंटिलेटर्स किंवा बायपीप आणि रेमडेसिविरच्या सुमारे चार लाख 22 हजार डोस रस्ते किंवा हवाई मार्गाने रवाना करण्यात आले.

एकूण 17 कोटी 92 लाख 98 हजार 584 डोस आतापर्यंत देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 18 ते 44 वयोगटातील चार लाख 40 हजार 706 जणांना लसीचा पहिला दोस देण्यात आला. त्यामुळे या वयोगटातील एकून लाभार्थ्यांची संख्या 39 लाख 26 हजार 334 वर पोहोचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.