लखनऊ: मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडू नये हा साधा नियम आहे. पण या नियमांकडे अनेकवेळा काही जण दुर्लक्ष करतात. मात्र हेच दुर्लक्ष कधी कधी आपल्या जीवावर देखील बेतू शते. याचीच प्रचिती सध्या एका व्हिडिओमधून आली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील एका चौकात भरधाव कारने तरुणाला धडक दिली. हा तरुण मोबाईलवर बोलत रस्ता ओलांडत होता. कारचा वेग जास्त असल्याने तरुण गोंधळला. तो मागे-पुढे झाला. मात्र कारने त्याला जबरदस्त धडक दिली. कारचा वेग जास्त असल्याने तरुण हवेत चक्क ८ फूट हवेत उडाला. या अपघातात तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
मोबाइल पर बात करते सड़क पार करना…ना बाबा ना…। आप देखें, सहम जाएंगे। जिंदगी न मिलेगी दोबारा…।
आंखें खोलने वाला यह खौफनाक हादसा लखनऊ के आलमबाग (बाराबिरवा) का है।@dainikjagranlko @JagranNews #Lucknow#nomobilewhiledriving pic.twitter.com/echbn7jOzS— Pawan Tiwari🇮🇳 🇮🇳 (@pawan_pawant) August 5, 2021
अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ १७ जुलैचा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आलोक कुमार राय यांनी दिली. अपघातात अनिल उपाध्याय नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो जौनपूरचा रहिवासी होता.
विजयनगरमधील एका खासगी कंपनीत तो कार्यरत होता. १७ जुलैच्या सकाळी तो मोबाईलवर बोलत बाराबिरवा चौक ओलांडत होता. त्याचवेळी एका भरधाव कार त्याच्या दिशेनं आली. कारनं अनिल जोरदार धडक दिली. त्यानंतर तो सात-आठ फूट हवेत उडाला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
गंभीर दुखापत झालेल्या अनिलला पोलीस रुग्णालयात नेत होते. मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. अनिलचे भाऊ आकाश यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कार क्रमांकाच्या आधारे पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.