रस्ते दुरुस्तीसाठी 5 कोटीः लंके

सुपा – पारनेर-नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी 4 कोटी 77 लाख 85 हजार रूपयांचा निधी मंजुर झाला असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली. मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे निवणुकीपूर्वी काही महिने आगोदर या रस्त्यांच्या दुरूस्तीसंदर्भात आपण सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.

निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर आपण मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानही नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आपणाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळीही आपण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून रस्ते दुरूस्तीसंदर्भात पाठपुरावा केला होता. मध्यंतरी आचारसंहीतेच्या काळात या कामांना प्रारंभ होउ शकला नाही. आचारसंहीता संपल्यानंतर आपण पुन्हा या कामासाठी सबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

बेल्हे, अळकुटी, निघोज रस्त्यासाठी 73 लाख 24 हजार, राहता लोहारे, पारनेर, वाडेगव्हाण रस्त्यासाठी 1 कोटी 16 लाख 86 हजार, भाळवणी, गोरेगांव, किन्ही, कान्हूर, वडगांदर्या, दरोडी, अळकुटी, म्हस्केवाडी, चोंभूत रस्त्यासाठी 52 लाख 87 हजार, वडझिरे, पारनेर, सुपा, वाळकी, कौडगांव रस्त्यासाठी 41 लाख 85 हजार, राज्य मार्ग 223 ते वासुंदे, वनकुटे रस्ता 32 लाख 27 हजार, पारनेर, बाबुर्डी, विसापूर, पिंपळगावंपिसा, एरंडोली ,वाळकी, घोसपूरी, घोडकेवाडी, रांजणगांवमशिद रस्ता 35 लाख 32 हजार, पारनेर, जामगांव, भाळवणी रस्ता 15 लाख 43 हजार, मांडवे, देसवडे, पोखरी, पिंपळगांवरोठा, अक्कलवाडी रस्ता 36 लाख 79 हजार.
राज्य मार्ग 50 ते बोटा अकलापूर ते पोखरी, कामटवाडी, पळशी, वनकुटे रस्ता 38 लाख 21 हजार,कान्हूर, वेसदरे, वडझिरे, चिंचोली, सांगवीसुर्या, जवळा रस्ता 15 लाख 78 हजार, वाडेगव्हाण, पाडळी, कळमकरवाडी, कडूस, बाबूर्डी, रस्ता 20 लाख 23 हजार रूपयांचा निधी मंजुर झाल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.