पीक विमा योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ – मोदी

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आणलेल्या नवीन पीक विमा योजनेला आज पाच वर्ष पुर्ण झाली. त्या संबंधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की या नवीन योजनेचा कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

अनेक प्रकारच्या आपत्तीतून शेतीचे जे नुकसान होते त्यापासून शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळाले आहे. पीएम फसल बिमा योजनेचा आपल्याला कशा प्रकारे लाभ झाला याची माहिती शेतकऱ्यांनी नमो ऍपवर टाकावी असे आवाहनही मोदींनी शेतकऱ्यांना ट्विटर संदेशात केले आहे.


या योजनेचा ज्यांना लाभ झाला आहे अशा शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो असेही मोदींनी या ट्विटर संदेशात नमूद केले आहे. या योजनेच्या लाभा बद्दल आपण आपले अनुभव नमोऍप वर शेअर करा त्यातून अनेकांना या योजनेच्या संबंधात माहिती व प्रेरणा मिळेल असेहीं मोदींनी नमूद केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.