पीक विमा आणि कर्ज माफीची शहानिशा करा : उद्धव ठाकरेंचा शिवसेना खासदारांना आदेश   

जिंकण्याचा आत्मविश्वास नसेल तर जागा मोकळी करा : उद्धव ठाकरेंचा शिवसेना खासदारांना इशारा 

मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील आमदार आणि खासदारांना आपापल्या मतदारसंघांमध्ये लक्ष घालून काम करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ या आपल्या निवासस्थानी पक्षाचे आमदार आणि खासदारांची एक बैठक बोलावली होती. यावेळी पक्षाच्या जनप्रतिनिधींना उद्धव ठाकरे यांनी आपापल्या मतदार संघांमध्ये लक्षपूर्वक काम करत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रकर्षाने मांडण्याचे निर्देश दिले तसेच भाजपसोबत युतीचा निर्णय आपण घेऊ तुम्ही काम करा असं देखील सांगितलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या हर्षल प्रधान यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे. “शिवसेना ही निवडणूक आपल्या पूर्ण ताकदीनिशी लढवणार आहे. सर्वच खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये लक्षपूर्वक काम करायचे असून जर कोणाला आपल्या विजयाविषयी खात्री नसेल तर त्यांनी आपली जागा दुसऱ्यांसाठी मोकळी करावी.” अशा सूचना ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना दिल्याचे प्रधान यांनी सांगितले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदारांना शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा आणि कर्जमाफीसारख्या योजनांचा निधी पोहचला आहे का? याबाबतची सविस्तर माहिती घेण्याचे आदेश देखील ठाकरे यांनी दिले आहेत असे प्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)