पुणे – पुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये अशी सूचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीने केली आहे.
पुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावली आहे. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्या मुठा नदीपात्रात मगर आढळली आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.