शेकडो पिलांना पाठीवर घेऊन फिरणारी मगर

धृतमान मुखर्जी या छायाचित्रकाराने भारतातील राष्ट्रीय चंबळ अभयारण्यात टिपलेल्या मगरीच्या छायाचित्राचा यावर्षीच्या वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर या स्पर्धेत गौरव झालेला आहे. ही नर जातीची मगर असून त्याने सात ते आठ मगरींशी केल्या समागमातून एवढ्या पिलांची उत्पत्ती झालेली असावी, असा अंदाज मुखर्जी यांनी बांधला आहे.

मगरींचा समावेश नष्ट होत असणाऱ्या प्राण्यांच्या यादीत करण्यात आलेला आहे. या अभयारण्यात सध्या पूर्ण वाढ झालेल्या एक हजारांपेक्षा जास्त मगरी आहेत. एकेकाळी भारतासह दक्षिण आशियातील देशांमध्ये 20 हजारांहून अधिक मगरी होत्या. आता उत्तर प्रदेशातील अभयारण्यांमधील पाणथळ जागांमध्ये सहा हजारांच्या आसपास मगरी आहेत.

नदीवर बांधण्यात आलेली धरणे आणि बंधारे, बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार वाळूचा उपसा यामुळे अनेक ठिकाणी मगरींचा अधिवास धोक्यात आलेला आहे. धरणांचे व्यापारीकरण आणि मासेमारीच्या क्षेत्रात वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मगरींचा वावर आणि अधिवास धोक्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.