UEFA Euro Cup 2021 | क्रोएशिया व इंग्लंडचा बाद फेरीत प्रवेश

लंडन – युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत झालेल्या सामन्यांत क्रोएशिया व इंग्लंड यांनी आपापले सामने जिंकत बाद फेरी गाठली. क्रोएशियाने स्कॉटलंडला 3-1 असे तर, इंग्लंडने चेक प्रजासत्ताकला 1-0 असे पराभूत केले.

स्कॉटलंडवर मात केल्यामुळे ड गटात क्रोएशियाने दुसरे स्थान मिळवले. क्रोएशियाकडून वयाच्या पस्तीशीत गोल करणारा लुका मॉड्रिक पहिलाच खेळाडू ठरला.

क्रोएशियाचा पहिला गोल 17 व्या मिनिटाला निकोला व्लासिकने केला. त्यानंतर 61 व्या मिनिटाला मॉड्रिकने गोल केला. तर, 77 व्या मिनिटाला इवान पेरिसिकने गोल केला. स्कॉटलंडकडून एकमेव गोल कॅलम मॅकग्रेगोरने 42 व्या मिनिटाला केला.

अन्य लढतीत इंग्लंडने चेक रिपब्लिकचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जरी इंग्लंडला आणखी एकही गोल करता आला नाही तरीही त्यांची भक्‍कम बचाव सिद्ध करताना चेक संघालाही गोल करण्याची संधी दिली नाही. चेक संघाच्या बाद फेरीतील आशा इतर संघांच्या यशापयशावर आणि गुण सरासरीवर अवलंबून आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.