सिंगापूरच्या पंतप्रधानांवरची टीका भोवली; तब्बल 72 लाखांचा दंड

सिंगापूर – सिंगापूरचे पंतप्रधान ली हसियन लूंग यांच्यावर टीका करणे एका ब्लॉगरला महागात पडले आहे. लूंग यांची बदनामी केल्याप्रकरणी हायकोर्टाने ब्लॉगर लियोंग सेज याला एक लाख डॉलरचा म्हणजे भारतीय चलनात सांगायचे झाल्यास तब्बल 72 लाखांचा दंड ठोठावला. पंतप्रधान ली यांचा मलेशियातील मनी लॉंड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता.

दंड भरण्यासाठी या ब्लॉगरने जनसमुदायाकडे मदत मागितली होती व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लिओंगच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दंडापेक्षाही थोडी अधिक रक्कम जमा झाली आहे. त्याला दोन हजारपेक्षा जास्त लोकांनी मदत केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, टीका करण्याच्या अधिकारासाठी ही मंडळी समोर आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयावर लिओंगने म्हटले की, कोर्टाच्या निर्णयामुळे निराश झालो आहे. टीकेनंतर राजकीय नेत्यांकडून सामान्य नागरिकांवर मानहानीचा दावा ठोकण्याचा हा शेवटचा प्रकार असावा, अशी अपेक्षा व्यक्त करत असल्याचे लिओंगने म्हटले. 

सिंगापूरमध्ये अनेक राजकीय नेते टीका झाल्यानंतर कोर्टात धाव घेतात. प्रतिष्ठा, मान-सन्मानासाठी ही बाब आवश्‍यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राजकीय नेत्यांवर आरोप ेकेले की त्या विरोधात ते कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.