प्रजासत्ताक दिनाला स्वातंत्र्यदिन म्हणणाऱ्या शिल्पावर टीकेची झोड

मुंबई – संपूर्ण देशभरात 72 व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही वेगवेगळ्या माध्यमातून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचे बिग बी, अभिनेता अजय देवगन, अभिनेत्री काजोल, ऋषी कपूर, सोनू सूद, संजय दत्त, आयुषमान खुराना आणि इतर कलाकारांनी देखील प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  अशातच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र तिच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 

त्याचं झालं असं की, ‘शिल्पा शेट्टीकडून ट्वीट करताना एक गडबड झाली. तिने  ट्वीट करत प्रजासत्ताक दिना ऐवजी स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या. तिच्या या चुकीमुळे  सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल होत आहे. अनेक नेटकऱ्यानी तिच्या ट्विटचे स्क्रिनशॉर्ट काढून ठेवल्यामुळे तिच्यावर चांगलीच टीका केली आहे.  तिच्या ट्विटला नेटकऱ्यांनी रिट्विट करत मंदबुद्धी अभिनेत्री म्हणत टीका केली आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.