नवी दिल्ली – देशात सर्वत्र करोनाचा हाहाकार माजलेला असताना केंद्र सरकार नरेंद्र मोदी सरकारकडून अजूनही कर वसुली केली जात आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबताना दिसत नाही, असा संताप राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
जनता के प्राण जाएँ पर PM की टैक्स वसूली ना जाए!#GST
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2021
दरम्यान, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीतही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच कर वसुलीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.