मुंबई : भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दररोज सुरु आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडत नाहीत. दरम्यान, दिवाळीत धनंजय मुंडेंकडून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लावणीसह विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. याच कार्यक्रमावरून आता विरोधकांनी मुंडेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली ही पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही.
एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या हस्ते अकक्लकोट इथे विविध कामांचे लोकार्पण आणि भूमिपुजन झाले. त्यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.